मनोराज्य

Friday, May 18, 2012

संध्यानंद


                           संध्यानंद

गोड गुलाबी संध्या आली
सौम्य सोनेरी किरणां समवेत
नानांविध रंगांनी सजली
सौंदर्यधन घेउनी कवेत

गीरीराजाची कडा निराळी
झागमगली रवी किरणांनी
मुक्त हस्ताने कुणी हो उधळला
हा गुलाल विशाल गगनी

चिवचिवाट करीत पक्षी उडाले
घेण्य गगन भरारी
जणू उसळले या सौख्याने
आनंदगीत उरी

स्नेह दावितो, ममता देतो
हा गगनाचा गाभारा
झोंबत झोंबत गारवा देतो
अवचित पिसाट वारा

दूर दूर हि छटा पसरली
निळ्या अनंत गगनी
लाल गुलाबी धरा जाहली
किती लाज लाजुनी

निखळतेने गगनी नटली
सौंदर्याची हि लेणी
मावळतिचेही सौंदर्य अनोखे
निसर्गाची हि करणी

आशिष ढाणकिकर
अड्व्होकेट, मुंबई

No comments:

Post a Comment