आज मला जाणवले धुंद धुंद चांदणे
सळसळता गारवा अन धडधडती स्पंदने
तीर तुझ्या नजरेचे अन मंद मंद हासणे
हसून ते लाजणे अन गहिवरल्यागत वागणे
उगाच सोंग झाले, उगाच ढोंग केले
भाव मनी असता उगाच पाळली रुदने
हळुवार अंतरी हे मज काय होत आहे
क्षणात मन पुन्हा हे बेभान होत आहे
अमित हर्ष-उल्हास, आमोद चिकार आहे
स्वर्गसुखासही आता कसली बिशाद आहे
तव स्पर्श मोरपंखी, ते भाव हृदयस्पर्शी
तो गंध चंदनाचा मनात साठवून आहे
आता तुझेच भास, तुझीच मनात आस
तव निर्भेळ प्रेमास्तव मन आसक्त होऊ पाहे
तमा न ऊरी कसली आता, ना व्यर्थ चिंता मनी असे
हवीहवीशी साथ तुझी अन तुझेच नाते हवेहवेसे
रूप तुझे राधेचे, घनःश्याम मी स्वरूपे
प्राक्तन आपुले हे कि, व्हावे एकरूपे
आशिष ढाणकिकर
अड्व्होकेट, मुंबई
(दि. २३ व २४ मे च्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेच्या हृदयस्पर्शी भागांवरून स्फूर्ती घेऊन केलेली कविता)
Khup chan
ReplyDeleteThank you :)
DeleteThank you :)
Delete