खरं तर असं म्हणतात कि विस्मृती हा एक आशिर्वाद आहे, आणि नक्कीच तो आहे कारण त्यामुळे आयुष्यातील वाईट घटना, प्रसंग माणूस विसरतो आणि आयुष्य सहज व्यतीत करू शकतो. पण त्याचप्रमाणे अनेकदा आठवणी देखील प्रोत्साहन देतात.
जसजसे दिवस जातात, माणसाचं वय तसतसं वाढत जातं, आणि म्हणता म्हणता बालपण कधी हरवून जातं तेच कळत नाही. कधी कधी आयुष्यातला हा यंत्रवतपणा, रुक्षपणा प्रचंड दुखावून जातं. मग मनात हलकेच बालपणाच्या आठवणी तरळतात. किती छान दिवस होते ते. खेळणं, बागडणं, हसणं, मग उगाच रडणं, हट्ट करणं पण राग, द्वेष, मत्सर या पासून खूप लांब. ना कशाची चिंता, ना कशाची काळजी. आज लहान लहान बाळांत आपण आपलं बालपण पाहतो आणि आपसूकच सुखावून जातो कारण त्याचं ते निरागस हसणं, खेळणं आपल्या मनाला भिडतं, पटतं.
मग कधी कधी आपणही उगाच बालिश वागतो, खोड्या करतो, हट्ट धरतो. खोटं खोटंच का असेना पण आयुष्याला ह्या गोष्टी रंगत आणतात आणि सुकर करतात, नाही का?
बालपण देगा देवा.......
This comment has been removed by the author.
ReplyDelete