मनोराज्य

Tuesday, September 20, 2011

shunyatwa





शून्य - म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सगळं काही. शून्य हा एक आकडा आहे आणि शून्यत्व हि एक संकल्पना. जसं इतर आकड्यांना शुन्याशिवाय महत्व प्राप्त होत नाही तसंच आपलं आयुष्य शून्यत्वाशिवाय अपूर्ण आहे. जेवढी हि संकल्पना क्लिष्ट किंवा बोजड वाटते तेवढीच ती सहज, सोपी , आणि आनंददायी आहे. कारण शून्य कधी धन हि नसतो आणि ऋण हि नसतो. तो केवळ शून्य असतो. आपल्या आयुष्यात या शून्याची नितांत गरज आहे .
आपलं आयुष्य आशा आणि निराशा या दोन गोष्टींनी पिडीत झालेलं आहे, आशावाद आपण ओढून आपल्या आयुष्यात आणतो आणि तो आला नाही तर निराशावाद आपसूकच आपल्या आयुष्यात मुक्काम ठोकतो. जेंव्हा आपण आशावादी असतो तेंव्हा सतत प्रयत्नशील असतो आणि प्रत्येक यश प्राप्त करण्याची आपली स्पृहा असते, आणि ती अमर्याद असते कारण दिवसागणिक इच्छा सतत वाढतच असतात, आणि त्यामुळे कधीतरी उरलेल्या अपूर्ण इच्छामुळे किंवा लागत असलेल्या कष्टांमुळे मन दुःखी होतं. आणि अपयश आलं तर माणूस लगेच विफल होतो आणि आयुष्याला स्वतःच दुःखाच्या खाईत झोकुण देतो.
खरं तर आयुष्यात आपण काय शोधतोय हेच आपल्याला माहित नाही. यशापयश, सुख-दुःख, गरिबी- श्रीमंती, सान-महान अश्या या मायाजालात आपण पुरते अडकलेलो आहोत. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे, आपण एक तर आशावादी / प्रत्यक्षवादी असतो किंवा निराशावादी असतो. आणि दुर्दैवाने दुःख दोन्हींकडे असतंच.
माणूस आनंदाच्या शोधात आहे आणि खरा आनंद शून्यात आहे. आपण अपयश टाळण्याचा प्रयत्न करतो कारण त्यात दुःखं असतं पण यशाचं सुखदेखील कुठे चिरकाल असतं? तेही अल्पकालीनच नाही का? त्यामुळे चिरकालीन सुखासाठी शून्यत्वाच अनन्यसाधारण महत्व आहे. तेंव्हा आपल्या आयुष्यात आपण शुण्यात्वाचा अनुभव घ्यायलाच हवा.
कर्मण्ये वा धीकारास्ते, मा फलेषु कदाचन II हे गीतेमधले ज्ञान शून्यत्वाचच प्रतिनिधित्व करतं. शून्यत्वात चिरकाल आनंद आहे. शून्यत्वच जीवन आहे कारण शून्यत्वातच ईश्वर आहे.

( शून्यत्व म्हणजे- त्रीदोषापासून मुक्त जीवन, अनासक्ती, इच्छा रहित परोपकार व कर्म, ईश्वरीय सहवास आणि मोक्ष. शून्य सार्वभौम आहे.)

No comments:

Post a Comment